महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्यपदी राजन नाईक यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्यपदी राजन नाईक यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत टुरिझम अँड हॉस्पिटलिटी कमिटीद्वारे पर्यटन क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम चेंबरच्या माध्यमातून केले जाते.

या कमिटीचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून या कमिटीवर सदस्य म्हणून कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक राजन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजन नाईक यांनी यापूर्वीही या कमिटीवर काम केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पर्यटन समितीचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेवर गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून राजन नाईक यांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे. नाईक यांनी यापूर्वीही या कमिटीवर काम केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पर्यटन समितीचे ते अध्यक्ष आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेला आहे. या जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण झाले आहेत पण काही समस्याही या क्षेत्रात असून त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहील असे राजन नाईक यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 19-10-2024