मंडणगड तालुक्यात गावोगावी लोकसहभागातून विहिरींची स्वच्छता

Jun 13, 2024 - 10:08
Jun 15, 2024 - 16:18
 0
मंडणगड तालुक्यात गावोगावी लोकसहभागातून विहिरींची स्वच्छता

मंडणगड : तालुक्यातील गावोगावी पावसापूर्वीचे पाणीपुरवठा करणाऱ्या जागांचे स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून, पिण्याच्या विहिरीची अंगमेहनतीने साफसफाई करण्यात येत आहे. चिखल, पालापाचोळा, दगडधोंडे काढून पावसाचे स्वच्छ पाणी साठविण्यासाठी ग्रामस्थ, महिलांनी परिश्रम घेतले.

पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची साफसफाई करून स्वच्छ पाणी मिळण्याच्या हेतूने अनेक गावांतून विहिरींची स्वच्छतामोहीम राबविण्यात आली. वर्षभर जमा झालेला कचरा, घाण, गाळ काढण्यात आला. नव्याने साचणारे पावसाचे पाणी दूषित होऊ नये म्हणून दरवर्षी प्रमाणे एक दिवस पाणी स्वच्छता श्रमदान मोहीम राबवून गावच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.

पावसाळा तोंडावर आल्याने सध्या तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी गावाच्या श्रमदानातून साफ केल्या जात आहेत. सर्वच गावातून नळ पाणी योजना कार्यान्वित असली तरी एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्या वेळी या विहिरीतील पाणी हंड्यातून डोक्यावरून घरी आणले जाते. वर्षभर या विहिरीत पालापाचोळा, धूळ, पावसाचे पाणी जाऊन गाळ निर्माण होतो.

तसेच पाण्यात अनेक जलचर असतात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर विहिरीतील झरे नव्याने वाहण्यास सुरुवात होते. त्या आधी गावातील ग्रामस्थ एकत्रित येत अशा विहिरी साफ करून त्यातील गाळ काढतात. पालेकोंड येथील ग्रामस्थ, महिलांनी शिडीच्या साह्याने वीस फूट विहिरीच्या तळाशी जात दूषित पाणी उपसा करून गाळ काढला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow