तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीला; ४० हजार लांबवले

Jun 13, 2024 - 11:37
Jun 13, 2024 - 14:37
 0
तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीला; ४० हजार लांबवले

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीस गेली. या बॅगेतील ४० हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरली आहे. योगेश सुरेश मेस्त्री (वय ३७) यांनी याची फिर्याद दिली आहे. 

मेस्त्री हे तुतारी एक्स्प्रेसने दादरहून रत्नागिरी असा प्रवास मंगळवारी करत होते. या प्रवासात मेस्त्री यांची बॅग चिपळूणदरम्यान चोरीला गेली. या वेळी त्यांनी आजूबाजूला शोधली असता मिळाली नाही. त्या बॅगेत ४० हजार रुपयांची रोख रक्कम होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow