मागण्या मान्य करा नाहीतर नावे जाहीर करून त्यांना विधानसभेत पाडू, जरांगेंचा सरकारला इशारा

Jun 13, 2024 - 16:00
 0
मागण्या मान्य करा नाहीतर नावे जाहीर करून त्यांना विधानसभेत पाडू, जरांगेंचा सरकारला इशारा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा ८ जूनपासून मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. कालपासून मनोज जरांगेंची तब्येत ढासळली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा धावाधाव सुरु आहे. पण अखेर भाजप आमदार गिरीश महाजनांनंतर आता सकंटमोचक बनून सरकारच्यावतीने शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत गेले आहेत. भुमरे आणि देसाईंची जोडी जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहचले त्यांचा मनधरणीला यश आले आहे. सरकारच्यावतीने गेलेल्या देसाईंनी जरांगेंसोबत संवाद साधला आणि अखेर जरांगेंनी फक्त देसाई आलेत म्हणूण उपोषण मागे घेत आहे असे म्हणत उपोषण सोडले आहे.

मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून द्या अशी चर्चा झाली. सगेसोयरेची मागणी पुर्ण करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ द्या अशी विनंती देसाई यांनी जरांगेंना केली आहे. तसेच उद्या लगेच तातडीने सीएम शिंदेंकडे बैठक लावतो अशी ग्वाही देसाईंनी दिली आहे. मराठा समाजासाठी भरपूर केलंय आता थोडे राहिले ते लगेच पूर्ण करण्याचे आश्वासन देसाईंनी दिले आहे. तुम्ही इथे यायालाच नको होते असे थेट जरांगेंनी भुमरे आणि देसाईंना सुनावले आहे.

सरकारच्या शिष्ट मंडळांनी मनोज जरांगे यांच्याकडे ३० जूनपर्यंत वेळ मागितले यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले "ते मी देतो पण ३० जूननंतर सरकारचे काही ऐकणार नाही तसेच जर सरकारने माझ्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर राजकरणात उतरणार, विधानसभा लढवणार" असा थेट दम मनोज जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना भरला आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर विधानसभेत नाव घेवून उमेदवार पाडू असे थेट जरांगेंनी इशारा दिला आहे. मला राजकरणात येण्याची इच्छा नाही पण मागण्या पुर्ण नाही झाल्या तर मी राजकरणात उतरणार असा इशारा जरांगेंनी दिला आहे. 

आंदोलन सुरु झाल्यापासून परभणीचे खासदार संजय जाधव, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुरानी, बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून मनोज जरांगेंच्या आंदोलनकडे लक्ष वेधण्याची विनंती केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow