गुहागर : आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; तहसीलदार परीक्षित पाटील यांचं मार्गदर्शन

Jun 13, 2024 - 16:04
 0
गुहागर : आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; तहसीलदार परीक्षित पाटील यांचं मार्गदर्शन

गुहागर : बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपले ध्येय्य, आपले करिअर निश्चित करायचे आहे. आपण बऱ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. तशी आपल्याला संधी आहे या संधीचे सोने केले पाहिजे. इयत्ता १० वी, १२ वी मध्ये ९०टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून आयुष्याच्या गोलमध्ये आपण पहिली पायरी गाठलेय. पुढील शैक्षणिक प्रवास खडतर आहे. यात संधी आपली वाट पाहतेय. म्हणूनच ज्यामध्ये आवड आहे त्यात करिअर करा, यश निश्चित मिळेल, असे आवाहन गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांनी केले.

तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच आबलोली येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी १० वी, १२ वीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तहसीलदार पाटील पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनो स्वतः हून काय करायचे ते ठरवा. 

करिअरच्या पुढच्या टप्प्यात जाण्याचा प्रयत्न करा. विचार करा जे मी करिअर निवडले ते योग्य आहे का? आणि मग तयारी करा. डॉक्टर, वकील, अॅग्रीकल्चर, इंजिनिअर, बिझनेसमॅन अशी अनेक करिअर आहेत. जग करतेय म्हणून करायला जाणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षेत व अन्य परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे संदेश साळवी यांचेही तहसीलदारांनी कौतुक केले.

आबलोलीचे ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी, जांभारीच्या सरपंच वनिता डिंगणकर, खोडदेच्या सरपंच पूजा गुरव, आबलोलीचे मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, समाजसेवक विलास गुरव, तलाठी श्री. जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजक गजानन साळवी, संदेश साळवी हेही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटरचे संचालक संदेश साळवी, संचालिका सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, स्नेहा डावल, ममता डावल, शैलेश पवार, कशीष सावंत, दीपक कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ साळवी यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:31 PM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow