कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, रमेश कीर थेट लढत

Jun 13, 2024 - 16:41
 0
कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, रमेश कीर थेट लढत

त्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि रमेश कीर या दोघांमध्ये थेट सामना होणार आहे.

बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील २,१३,००० पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळविले असल्याने त्याचा फायदा कीर यांना होणार की विद्यमान आमदार निरंजन डावखरे हॅट्रिक करणार याबाबत उत्सुकता आहे. ठाणे जिल्हा निर्णायक असून त्याकडे दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow