लांजा शहरातील नागरिकांचा उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा आक्रमक पावित्रा..

Jun 15, 2024 - 15:54
 0
लांजा शहरातील नागरिकांचा उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा आक्रमक पावित्रा..

लांजा : लांजा शहरांमध्ये मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था मोठमोठे खड्डे चिखलाचे साम्राज्य यामुळे आक्रमक झालेल्या लांजा शहरातील नागरिकांनी आज उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत  महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था, दुतर्फा साईड पट्ट्या करण्याचे आदेश ठेकेदार ईगल कंपनी याला दिले आहेत. राजापूर प्रांताधिकारी यांनीही या घटनेची दखल घेतली असून पाईप लाईन गटारे आणि साईड पट्ट्या यांना पर्यायी जागा देण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

पाऊस सुरू झाल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने लांजा शहरात कोर्ले फाटा ते साटवली फाटा यादरम्यान रस्ता अतिशय चिखल मय आणि धोकादायक  झाला आहे. गटारे आणि सर्विस रोड नसल्याने रस्त्यावर चिखल साचून वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कोर्ले  फाटा येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठे खड्डे आणि चिखल झाला आहे. आज लाजा शहरातील ज्येष्ठ नागरिक श्री बबन स्वामी, श्री संजय बावधनकर, श्री दाजी गडहिरे, शेखर धावणे, संदीप राड्ये, लांजा तालुका पत्रकार परिषद अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आणि साईड पट्ट्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

लांजा शहराची नागरिकांची गरज लक्षात घेऊन पत्रकार सिराज निवरेकर यांनी महामार्ग उपअभियंता श्री राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून लांजा शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली. यावर तात्काळ श्री राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की लांजाची पाणी पाईप लाईन गटारे आणि साईड पट्ट्या त्याचे 80 टक्के काम झाले असून काही ठिकाणी जागेला विरोध झाल्याने त्या ठिकाणी गटारे आणि पाईपलाईन कामाला अडथळा आला आहे. ठेकेदार कंपनी ने सर्विस रोड पूर्ण करण्याचे सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी यांनाही गांजातील जागे संदर्भात होणारा अडथळा याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच साईट पट्ट्या काम पूर्ण होईल. पावसामुळे चिखल असल्याने अडथळा येत आहे. ठेकेदार याला पर्यायी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow