अनंत गीतेंची ओळख संसदेतले ‘मौनी खासदार’; शरद पवारांचं टीकास्त्र

गुहागर : अनंत गीतेंना तुम्ही अनेक वर्षे निवडून दिलंत. मी ही गेली अनेक वर्ष संसदेत आहेत. परंतू अनंत गीतेंची ओळख संसदेतले मौनी खासदार अशी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. गीतेंनी कोकणच्या प्रश्नांवर कधी तोंड उघडलेलं मी पाहिलं नाही, असं टीकास्त्र पवारांनी गीतेंवर सोडलं. राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी गुहागर येथे सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. सुनिल तटकरेंनीसुद्धा गीतेंवर जोरदार हल्ला चढवला. अनंत गीतेंनी कुणबी समाजासाठी काहीच केलं नाही, मात्र मी खासदार झाल्यावर चारही तालुक्यात कुणबी भवन उभारणार, असं आश्वासन तटकरेंनी यावेळी दिलं. दरम्यान, गीतेंच्या विरोधात राष्ट्रवादीची तोफ गुहागरमध्ये चांगलीच कडाडलेली पाहायला मिळाली.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here