अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले विवाह बंधनात अडकले

पुणे : अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले या दोघांचा विवाहसोहळा गुरुवारी मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नेरळ येथील फार्महाऊसवर जल्लोषात पार पडला. या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाल्यावर वऱ्हाडी मंडळी कोण कोण आहेत, याचीच चर्चा सुरू झाली. निसर्गरम्यस्थळी हा सोहळा संपन्न झाला. गेले अनेक दिवस या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर लग्नाबाबत दोघांनाही सातत्याने विचारणा केली जात होती. मराठमोळ्या पद्धतीनं हा विवाहसोहळा रंगला. सखीनं हिरव्या रंगाची पैठणी, नथ, पाटल्या, मोठ्या पुतळ्यांची माळ, वाकी, कोल्हापुरी साज असा अस्सल मराठमोळा पेहराव, तर सुव्रतनं मोतिया रंगाचा कुडता, शाल टोपी असा पेहराव केलेला फोटो लग्नानंतर काही वेळात व्हायरल झाला.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here