अस्तित्वात असलेल्या पाण्याचा वापर जपून करा- आर्ते

संगमेश्वर: भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना अस्तित्वात असलेले पाणी जपून वापरण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व जलनायक युयुत्सु आर्ते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्रात पडणाच्या पावसापैकी ५० टक्के पाऊस हा कोकणात पडत असतो, कोकणातील सर्वाधिक पाऊस हा संगमेश्वर तालुक्यात नोंदला जातो. असे असतानाही याच तालुक्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. जलसंपदा, कृषी खाते, ग्रामपंचायत यांच्या समन्वयाच्या अभावामुळे सर्वाधिक पाऊस पडूनही दुथडी भरून वाहणारे परे व नद्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळत असते. गरजेपुरते पाणी न अडवल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. प्रशासनाच्या माध्यमातून छोटी धरणे, बंधारे बांधून पाणी अडवत पाणीटंचाईची तीव्रता निश्चित कमी करता येऊ शकते. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गरजेपुरते पाणी वाडीतील परे, नदी यांवर बंधारे बांधून अडविणे आवश्यक आहे. पाणी वाया घालवू नये, तसेच असलेले पाणी खराब करू नये, असेही आवाहन देखील आर्ते यांनी केले आहे. माशांच्या जाती टिकवणे काळाची गरज आहे. यासाठी कीटकनाशकांचा वापर करून मासेमारी करू नये, असे आर्ते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here