‘ओएलएक्स’ वर खरेदी पडली महागात; तरुणाला २६ हजारांचा चुना

रत्नागिरी: कुरिअरमार्फत कॅमेरा पाठवून दिलेला आहे, असे सांगत तरुणाकडून पेटीएमव्दारे सुमारे २६ हजार १५० रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी दुपारी १ ते ७ एप्रिल रोजी दुपारी २ वा. कालावधीत घडली आहे, विकास पटेल (रा. आर्मी कॅम्प सुरत, गुजरात) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शिवराज शामराव पाटील (३३, रा.जे.के. फाईल्स, रत्नागिरी) याने शहर पोलिसांकडेरविवारीदुपारीतक्रार दिली. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी शिवराज पाटील याने ओएलएक्स अॅपवर कॅमेरा विक्रीची जाहिरात पाहीली होती, ती पाहून त्याने कॅमेरा विकत घेण्यासाठी विकास पटेल याच्याशी संपर्क साधला असता विकासने आपला व्हॉटसअॅप नंबर देऊन शिवराज पाटीलला मोबाईलवर कॅमे-याची माहिती पाठवली. त्यानंतर इंडियन कुरिअरद्वारे मी कॅमेरा पाठवून दिला असून तुम्ही पेटीएमव्दारे २६ हजार १५० रुपये पाठवून द्या, असे विकासने शिवराजला सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिवराजने पैसे पाठवून दिले. परंतु, कॅमेरा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रविवारी त्याने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here