कॅन्सर एड फाउंडेशनला क्लार्कनेच लावला लाखोंचा चुना

रत्नागिरी: कॅन्सर एड फाउंडेशन कोकण रत्नागिरी या संस्थेच्या ऑफीसबॉय कम क्लार्कने खोट्या सहीने संस्थेच्या बँक खात्याचे परस्पर चेकबुक घेऊन खात्यातून वेळोवेळी १ लाख ८४ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० नोव्हेंबर २०१८ ते २ मार्च २०१९ या कालावधीत घडली आहे. सुरज अनिल देसाई (रा.नाचणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात संस्थेच्या खजिनदार दिलनाज मुबारक शेख (५९, रा.निवखोल, रत्नागिरी) यांनी मंगळवारी सायंकाळी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, सूरज देसाई हा २००७ पासून कॅन्सर एड.फाउंडेशन संस्थेत कामाला होता. ही संस्था कॅन्सर पेशंटना औषधे व काही रक्कम मदत देते. या संस्थेचे खाते असलेल्या बँकेचे सर्व व्यवहार सूरजकडे होते. वरील कालावधीत त्याने संस्थेच्या नकळत खोट्या सहीने बँकेतून परस्पर चेकबुक घेत १ लाख ८४ हजार ५०० एवढी रक्कम अध्यक्ष व ट्रेझरर यांच्या खोट्या सहीने चेकव्दारे काढून घेतले. तसेच संस्थेला लोकांकडून दिलेली जकात रक्कम व देणगी तसेच डिपॉझीटची रक्कम बँकेच्या खात्यात जमा न करता स्वतः च्या फायद्यासाठी वापरुन फसवणूक केली. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.


या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here