गरिबाला पैसे देण्याची संधी होती तेव्हा नाही दिले, आता कसले आमिष दाखवता?- मुख्यमंत्री

अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला. “गरीबाला पैसे देण्याची संधी इतके वर्ष तुमच्या हातात होती तेव्हा का नाही गरीबांचे कल्याण केले? आता कसले आमीष दाखवता?” असा प्रश्न विचारत त्यांनी कांग्रेसवर प्रहार केला. आज अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. ‘गरीबांचा काँग्रेसवर विश्वास नाही.” असेही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेसला माहीतच नाही आपण काय करणार आहोत ?

काँग्रेस निवडणुकीसाठी उभी तर आहे, मात्र आपण काय करणार आहोत, आपला नेता कोण, आपण का निवडून यायचे हे काहीच माहिती नाही. असे असताना आपण तरी यांना का निवडून द्यायचे असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधत ते म्हणाले की, “राहुल गांधी यांची भाषणे एखाद्या टीव्ही मालिकेसारखे असतात, त्यातील पात्र आणि कथा मात्र काल्पनिकच असतात. त्यांनी जनतेला ७२ हजार रुपये देणार असे सांगितले मात्र ते कसे देणार याची काहीच योजना त्यांच्याकडे नाही. असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना देखील टोला लगावला. यावेळी गेल्या ५ वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामांचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण एकीकडे मंगळावर पोहोचलो मात्र ५ वर्षांआधी आपल्या देशात पुरेशी शौचालये नव्हती, मात्र स्वच्छ भारत योजनेमुळे आज देशातील ९८% घरांमध्ये शौचालये आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केवळ ५ वर्षात ५ कोटी घरांचा निर्माण झाला आहे, आणि २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीबाकडे स्वत:चे घर असेल. उज्ज्वला, उजाला, आयुष्यमान भारत, जनधन अशा कितीतरी योजनांमुळे देशातील सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडला आहे.
जेव्हा भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केली तेव्हा संपूर्ण जगाने आपल्या देशाचा साथ दिला मात्र पाकिस्तान आणि काँग्रसेनेच यावर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने आपला जाहीनामा सादर केला, आणि त्यामध्ये त्यांनी देशद्रोहाचा कलम १२४ अ काढून टाकण्याचा निर्णय घेतला. काश्मीर येथून अतिरिक्त सैन्यबळ काढून टाकणार असे सांगितले, ज्यांना आपल्या सेनेवरच विश्वास नाही त्यांच्या हातात देश दिल्यावर काय होईल, असेही ते यावेळी म्हणाले. या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here