गृहसंकुलात सदनिका देतो सांगून बिल्डरने केली १ कोटीची फसवणूक

गुहागरमध्ये विकसित करणाच्या गृहसंकुलात सदनिका देतो, असे सांगून एका बांधकाम व्यावसायिकाने पाच ते सहाजणांची एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पवार बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या ८ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गुहागर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवी सुरेश हेदवकर (सध्या रा. दादरमुंबई) यांनी गुहागर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार बांधकाम व्यावसायिक पवार कुटुंबातील सात आणि अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दीपक काशीराम पवार, संतोष बाळकृष्ण पवार, बाळकृष्ण राम चंद्र पवार, अश्विनी संतोष पवार, स्नेहा संतोष पवार (सर्व रा. मुंबई), चकोर रामचंद्र रावूळ (रा. विरार), संघमित्रा जितेंद्र पवार (काळा चौकी), दिनेश विनायक पवार (पवार साखरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पल्लवी हेदवकर आणि अन्य सहाजणांनी गुहागर येथील शिवाजी चौक कीर्तनवाडी येथे पवार होरायझन नावाचे गृहसंकुल बांधले. त्यामध्ये सदनिका मिळावी या हेतूने हेदवकर यांनी पवार बिल्डरकडे मार्च २०१६ नंतर एक कोटी एक लाख ४० हजार रुपये रोखीने दिले. त्यानंतर आपल्याला सदनिका मिळेल या दृष्टीने प्रतीक्षा केली. मात्र मार्च २०१९ उजाडले तरी सदनिका मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हेदवकर आणि अन्य सहकाच्यांनी गुहागर पोलिसात दि. १४ रोजी तक्रार दाखल दिली आहे. त्यानुसार आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार करीत आहेत.या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here