चिपळूण येथे सव्वा लाखाचा मद्यसाठा जप्त

रत्नागिरी ः प्रतिनिधी

विभागीय उपायुक्त कोल्हापूर विभाग यांच्या सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरीच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी भरारी पथकाने चिपळूण येथे छापा टाकून 1 लाख 28 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना अटक केली.

श्रीकांत लक्ष्मण शिवगण (रा. सुतारवाडी, चिपळूण), नीलेश दत्ताराम भुवड आणि एकनाथ दत्ताराम साळवी (दोघे रा. कोळकेवाडी, चिपळूण) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहे. त्यांच्याविरोधात दारूबंदी गुन्ह्यांतर्गत गुन्हे नोंद करून एका दुचाकीसह देशी मद्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, प्रभारी निरीक्षक सुरेश पाटील, तसेच जवान विशाल विचारे, सागर पवार, महादेव चौरे, अर्शद शेख यांनी केली.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here