जितने सफेद बाल मेरे सर और दाढ़ी में हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं-भारत

अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाची त्याचे चाहत्यांना आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटातील सलमानचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ वेगळ्याच अवतारात या पोस्टरमध्ये दिसत आहे. ‘इतने सफेद बाल मेरे सर और दाढ़ी में हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं #Bharat.’ असं लिहून सलमाननं स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या फोटोत सफेद दाढी, मिश्या आणि चश्मा लावलेला सलमान बराच वयस्कर दिसत आहे. सलमानच्या चाहत्यांना त्याचा हा लुक प्रचंड आवडला असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘भारत’ सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं असून या सिनेमाच्या निमित्तानं सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.  इथे पहा https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1117661347452522496


या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here