निवडणूक आयोगाकडून मतदार ओळख पटवण्यासाठी ११ दस्ताऐवजांना मान्यता

निवडणूक आयोगाने मतदान करताना मतदान केंद्रावर मतदाराची ओलाख पटवण्यासाठी जे मतदार मतदान ओळखपत्र सादर करून शकणार नाहीत, अशांना ओळख पटवण्यासाठी पर्यायी ११ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दस्तऐवज सादर करून ओळख निश्चित करू शकतात, असे निर्देश दिले आहेत.

मतदान प्रसंगी ओलाख पटवण्यासाठी सादर करावयाची पर्यायी कागद्प्त्रांमध्ये पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शासकीय आणि खाजगी कंपन्यांचे ओळखपत्र, बँक/पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदार/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, आधारकार्ड यांचा समावेश आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here