पर्रिकरांच्या मुलानं पवारांना पत्र लिहून व्यक्त केला संताप

पणजी : जिवंतपणी कधी माझ्या वडिलांची साधी विचारपूसही केली नाही. आता त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करू नका, अशा आशयाचं संतापजनक पत्र मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पाल पर्रिकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. मनोहर पर्रिकर यांनी राफेल विमानांचा व्यवहार न पटल्यामुळे संरक्षण मंत्रीपद सोडलं होतं, असा दावा  शरद पवार यांनी केला आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर उत्पाल पर्रिकर भडकले आहेत. तुमचा हा प्रयत्न म्हणजे असंवेदनशील आणि दुर्दैवी आहे. शरद पवार साहेब तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, असंही उत्पाल पर्रिकरांनी पत्रात लिहिलं आहे. आमचं कुटूंब आणि गोव्याची जनता दु:खामध्ये आहे. कृपया तुम्ही अशा कृत्यापासून दूर रहा, अशी विनंती उत्पाल यांनी पवारांना केली आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here