‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत असलेला बहुचर्चित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपण ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. चित्रपटात अभिनेता विवेक ओबेराॅय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका साकारत आहे. चित्रपटात बोमन इराणी, बरखा मिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायण, जरीना वहाब, अंजन श्रीवास्तव आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केले असून 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here