मी ब्रिटनचा नागरिक, मग फरार कसा ; मल्ल्याचा भाजपला सवाल

कर्जबुडव्‍या विजय मल्‍ल्‍याने सोशल मीडियाच्‍या आधारे भाजपवर निशाणा साधला आहे. ‘मी १९९२ पासून ब्रिटनमध्ये राहत आहे, हे सत्य आहे. मग मी भारतातून पलायन केले आहे, असे भाजप  कशाच्‍या आधारावर म्हणत आहे,’ असा टोला मल्ल्याने भाजपला लगावला आहे. 
विजय मल्ल्याने ट्विटरवरून भाजप  निशाणा साधला आहे. ”भाजप सरकारने मी थकविलेली बँकेची सर्व रक्कम रिकव्हर केल्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहे. असे असतानाही भाजपचे प्रवक्ते सातत्याने मला का लक्ष्य करत आहेत”, असा प्रश्‍न मल्ल्याने उपस्‍थित केला आहे. 

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here