रत्नागिरीचे तीन नेमबाज सुपुत्र करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी: उत्तमोत्तम खेळाडू घडवणाऱ्या रत्ननगरीतून अखिल भारतीय ३०० मीटर बिगबोर रायफल जी.व्ही.मावलंकर अजिंक्य पद स्पर्धेसाठी तीन सुपुत्रांची निवड झाली आहे. हि स्पर्धा दि. १५ ते १९ एप्रिल या कालावधीत सी.आर.एक. आर्मी रेंज, महू, मध्यप्रदेश येथे होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करण्यासाठी श्री. मानस सुरेंद्र देवळेकर (वय:३८,रत्नागिरी), चि. मोहनिश नंदकुमार हिरवे (वय:२०, लांजा) व चि. अथर्व निलेश काळे (वय:१६,रत्नागिरी) या नेमबाजांची निवड झाली आहे. रत्नागिरीतील प्रख्यात नेमबाज श्री. पुष्कराज जगदीश इंगवले यांचे मार्गदर्शन लाभल्याने इथपर्यंतचा पल्ला गाठणे शक्य झाल्याचे या नेमबाजांनी सांगितले. त्यांच्या पुढील वाटचालीस रत्नदुर्ग पिस्तुल व रायफल क्लब माळनाका याचे कार्यवाह श्री. विनयजी देसाई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here