राज ठाकरेंचे मुंबई बाहेर स्टँड-अप कॉमेडी शो सुरू- तावडे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचे मुंबई बाहेर स्टँड-अप कॉमेडी शो सुरू आहेत, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्या असं राज ठाकरे म्हणतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहोत की त्यांच्या सभांचा खर्च त्या ठिकाणच्या काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवाराच्या खर्चात टाकावा आणि त्या खर्चाचं काय करावं ते निवडणूक आयोगाने सांगाव, असं विनोद तावडें म्हणाले. मोदी-शहा यांना संपवू असं राज म्हणतात पण मनसेचा साधा एक आमदार, खासदारही नाही, असा टोला विनोद तावडेंनी लगावला आहे. दरम्यान, शुक्रवार कालपासून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात 8 ते 10 सभा घेणार आहेत.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here