लालकृष्ण अडवाणींचा घरचा आहेर : राजकीय मतभेद असणाऱ्यांना भाजप ‘देशद्रोही’ मानत नाही!

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे भीष्म पितामह आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी १७ व्या लोकसभेसाठी तिकीट नाकारल्यानंतर प्रथमच आपल्या ब्लॉगवरून पक्षाच्या सध्याच्या कार्यशैलीवर आसूड ओढताना सडकून टीका केली. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच दुश्मन मानले नाही. जे आमच्याशी सहमत नाहीत त्यांना देशद्रोही कधीच म्हणालो नाही असे त्यांनी नमूद करत भाजपच्या तथाकथित देशभक्तांना कानपिचक्या दिल्या. 

भाजपकडून अडवाणींचा जवळपास राजकीय प्रवासातून पत्ता कट करण्यात आला आहे. तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ब्लॉगमधून आपल्या वेदना व्यक्त केल्या. ते म्हणतात, भाजप ६ एप्रिलला स्थापना दिवस साजरा करेल. हा क्षण भाजपमध्ये सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. आम्ही थोडं मागे पाहिले पाहिजे, पुढे पाहताना आजूबाजूलाही पाहिले पाहिजे. भाजपच्या संस्थापक असणाऱ्यापैकी एक मी पण होतो. या भूमिकेतून देशातील जनतेशी अनुभव कथन करणं कर्तव्य समजले. पक्षासह या सर्वांनी मला स्नेह आणि सन्मान दिला. 

त्यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचेही आभार मानले. पुढे ते म्हणतात, मातृभूमीची सेवा करणे हे माझे मिशन होते. जेव्हा १४ वर्षाचा होतो तेव्हा आरएसएसमध्ये दाखल झालो. सत्तर वर्ष मी पक्षाशी अविभाज्यपणे जोडलो गेलो आहे. पहिल्यांदा जनसंघ त्यानंतर भाजप अशा दोन्हीचा संस्थापक सदस्य आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी अशा दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. 

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here