वायनाडमध्ये राहुल गांधी vs राहुल गांधी; कॉंग्रेस अध्यक्षांसमोर तगडे आव्हान

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. केरळातील वायनाड या मतदार संघामध्ये राहुल गांधींना थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात तीन असे उमेदवार आहेत की ज्यांची नावं राहुल गांधींच्या नावाशी मिळती-जुळती आहेत. वायनाडमधून के ई राहुल गांधी, अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के के राहुल गांधी आणि त्रिसूरचे के एम शिवप्रसाद गांधी हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन राहुल गांधी मैदानात उतरल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. चौघांच्या नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बसण्याची शक्यता आहे. वायनाड हा मतदारसंघ तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या सीमेवर आहे. दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केल्याचं बोललं जात आहे. वायनाडमध्ये के ई राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे शिक्षण एम.फिल पर्यंत झाले आहे. ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांच्याकडे पाच हजार रुपये रोख रक्कम आणि बँकेत फक्त ५१५ रूपये आहे. तर दुसरे उमेदवार के. राहुल गांधी हे पेशाने पत्रकार आहेत, तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे. यांचं उत्पन्न जवळजवळ दोन लाख रूपये आहे. तिसरे उमेदवार के एम शिवप्रसाद गांधी संस्कृतचे शिक्षक आहेत.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here