विविध समस्यांसंबंधी कोकण प्रवासी संघटनेतर्फे एसटी महामंडळाला निवेदन

कोकण प्रवासी संघटनेने एसटीच्या रत्नागिरी येथील विभाग नियंत्रकांना निवेदन देऊन विविध समस्या सोडवण्याच्या मागण्या केल्या आहेत. हे निवेदन अध्यक्ष अनिलकुमार जोशी, सचिव वसंत भोसले यांनी एसटी प्रशासनाकडे दिले. संघटनेच्यावतीने दिलेल्या मागणीनुसार चिपळूण एसटी बस स्थानकाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असून ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना भर उन्हात एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती पत्रा शेड उभारणे आवश्यक आहे. पावसाळ्यात देखील शेडअभावी प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काम जलद गतीने करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. चिपळूण बस स्थानकात रात्रीच्यावेळी बसचे फलक दिसत नाहीत. गाड्यांना फलक नसतात शिवाय आवश्यक आणि पुरेसा प्रकाश नसल्याने येथे चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. येथे प्रकाशाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गुहागर आगारातून एकाचवेळी चिपळूणकडे जाण्यासाठी बस सोडण्यात येतात. मात्र दुपारी १ ते चार वाजेपर्यंत या मार्गावर बस फेच्या नसतात. त्यामुळे लोकांचे हाल होतात. गुहागर बोरीवली, विठ्ठलवाडी गाड्या सोडण्यात याव्यात. चिपळूणहन रामपूर-कात्रोली गोंधळे, दोनवली, पोसरे एसटी फेरी सुरू करावी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना गुहागर-चिपळूण मार्गावर सर्व थांबे नाहीत. त्यामुळे नुकसान होते, असे निवेदनात म्हटले आहे.या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here