शरद पवारांना लाज, लज्जा, शरम उरलीच नाही- ठाकरेंची खरमरीत टीका

बुलढाणा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवारांना लाज, लज्जा शरम काही राहिली नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. खामगाव येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचा काहींचा विचार आहे. त्यामुळे मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारांना विचारतो तुम्हाला हे चालेल का, असं ठाकरे म्हणाले आहेत. बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दाला जागा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here