शासकीय तंत्र निकेतनचा हीरक महोत्सव; माजी विद्यार्थी संघटनेकडून एकत्र येण्याचे आवाहन

१९६०-६१ च्या दरम्यान पहिल्यांदाच कोकणात ताांत्रिक त्रिक्षण देण्यासाठी शासकीय तंत्र निकेतनची पहिली मान्यता महाराष्ट्र शासनाकडून आली आणि कोकणातल्या विद्यार्थ्याला भविष्याची नवी क्षितिजे खुणावू लागली. पहिली जवळपास तीसेक वर्ष सिव्हील,इलेक्ट्रिकल,मेकॅनिकल या तीन शाखांचे पदविका शिक्षण येथे दिले जाई. त्यात गेल्या बावीस वर्षात कॉम्प्युटर, इलेक्ट्रोनिक्स अँँड टेलीकम्युनिकेशन, फार्मसी ह्या पदविका अभ्यासक्रमाची वाढ झालीय. जगण्याच्या किमान साधनांची वानवा असताना शासकीय तंत्र निकेतन मधून मिळत असलेल्या ह्या व्यावसायिक शिक्षणानंतर मुलांना अगदी कमी वयात आपापल्या कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावता आला. आणि हे शैक्षणिक काम गेली ६० वर्षे अव्याहत चालु आहे.काही विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी शिक्षण घेण्यासाठी अन्य महाविद्यालयात गेले तर काही पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशीसुद्धा गेले. अनेक विद्यार्थी इथल्या व्यावसायिक शिक्षणानंतर नोकरीला लागले किंवा काही स्वतंत्र व्यवसाय करायला लागले. गेल्या साठ वर्षात जवळपास दहा हजार विद्यार्थी पदविका घेऊन बाहेर पडले. आज देशविदेशात अनेक ठिकाणी हे विद्यार्थी विविध लहान मोठ्या पदांवर काम करत आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून शासकीय तंत्र निकेतनच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना तयार झाली असून त्याद्वारे विद्यार्थ्याना उपयुक्त असे अनेक उपक्रम राबवले जातात. ह्याच संघटनेकडून तंत्र निकेतनच्या हीरक महोत्सवाची तयारी केली जात आहे. त्यानिमित्त ४ व ५ जानेवारी २०२० ला स्थापनेपासूनच्या सर्व विद्यार्थ्याना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री भूषण बेलवलकर यांनी तंत्र निकेतनचे प्राचार्य श्री. ग.च.खुरसाडे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कामात पुढाकार घेतला आहे. तरी शासकीय तंत्र निकेतनच्या १९६१ पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते कि त्यांनी कृपया कार्यालयाशी अथवा श्री. बेलवलकर यांच्याशी ९४२२६६०३०३ या नंबरवर संपर्क साधावा.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here