सावधान! काजू बी खरेदीत परप्रांतीयांकडून होतेय ग्रामीण जनतेची फसवणूक

लांजा: तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या भोळेपणाचा व अशिक्षितपणाचा फायदा उठवत परप्रांतीय बटर-टोस्ट विक्रेत्यांकडून काजूबी च्या खरेदीमध्ये फसवणूक केली जात आहे. बाजारभावापेक्षा अधिक भाव देण्याचे आमिष दाखवून वजनकाट्यामध्ये बेमालूमपणे कमी वजन दाखवून काजूबीची खरेदी केली जात आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून आंबा-काजूच्या लागवडीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा परप्रांतीय विक्रेत्यांकडून घेतला जातो. मार्च ते मे या महिन्यात काजूच्या उत्पादनाला सुरूवात होते. याच कालावधीत तालुक्याच्या गावागावांमध्ये बटर – टोस्ट विक्री करणाजया परप्रांतीय दाखल होतात. अशा विक्रेत्यांकडून गोरगरीब जनतेच्या अज्ञानपणाचा व भोळेपणाचा फायदा उठवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. टोस्ट-बटरच्या बदल्यात काजूबीची खरेदी केली जाते. मात्र काजूबी मोजण्यासाठी असणारे वजनकाटे शासनाकडून प्रमाणित केलेले नसल्याची बाब उघडकीस येत आहे. अशाप्रकारे या परप्रांतीय विक्रेत्यांकडून जनतेला काजूबीच्या खरेदीसाठी कधी बाजाभावापेक्षा अधिक पैशांचे आमिष दाखवून तर कधी टोस्ट-बटरच्या मोबदल्यात काजूबीचीखरेदी केलीजाते.त्यासाठी चुकीच्या काट्यांमधून काजूचे मोजम उप करताना हातचलाखी करून कमी वजन दाखवतात. एखाद्या ग्रामस्थाने १० ते २० किलो काजूबी दिली तरी ती ५ ते १० किलो कमीच भरते. या परप्रांतीय व्यापा-यांच्या भूल-थापांना येथील गरीब लोक सहज बळी पडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, यांनी याबाबत जागरूक राहून फसवणूक करणाच्या अशा भैय्ये व टोस्ट-बटर व्यावसायिकांवर बंदी घालून कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. प्रशासनानेही याबाबत कठोर पावले उचलायला हवीत, अशी मागणीही होत आहे.


या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here