IPL :अखेर विराटच्या रॉयल्सची पाटी राहिली कोरीच

पार्थिव पटेलच्या ६७ धावांच्या दमदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्ससमोर १५९ धावांचे त्यातल्या त्यात बरे टार्गेट ठेवले. पण, बेंगलोरच्या गोलंदाजांनी आपला ‘ऐतिहासिक वारसा जपत’ राजस्थानला धावांची लयलूट करण्याची पूर्ण परवानगी दिली. त्यातच क्षेत्ररक्षकांनीही झेल सोडण्याची स्पर्धाच सुरु केली. त्यातल्या त्यात स्मिथ संथ खेळल्यामुळे सामना अखेरच्या षटकातपर्यंत गेला खारा पण, त्रिपाठीने षटकार खेचत राजस्थानच्या रॉयल्सवर विजयी मोहर उमटवली आणि बेंगलोरचा ७ गडी राखून पराभव झाला. 

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here