जिल्हा काँग्रेसमुक्‍त करणार; आ. प्रसाद लाड

0

रत्नागिरी : भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी भाजपची ताकद वाढवण्याकरिता अन्य पक्षांतून ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या एकमेव सदस्य निशिगंधा सुतार, राजापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्कर सुतार यांच्यासह शिवसेनेचे अभिजित गुरव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा कार्यालयात आमदार प्रसाद लाड यांनी त्यांचे स्वागत करताना जिल्हा काँग्रेसमुक्‍त करणार असल्याचे सांगितले. अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. पूरपरिस्थितीमुळे फार मोठा कार्यक्रम करायचा नाही, असे ठरले. मूर सरपंच संजय सुतार, माजी सरपंच दिलीप कोळवणकर यांच्यासमवेत केशव गुरव, सांगवे, रत्नागिरीतील संजय आयरे यांच्यासमवेत शेकडो लोकांनी प्रवेश केला. यावेळी संजय सुतार म्हणाले की, आम्ही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 व्या वित्त आयोगातून जो विकास निधी दिला, त्यामुळे भाजपच्या विचाराने प्रेरित झालो. भास्कर सुतार यांनी आम्ही कोणत्याही पदासाठी नव्हे तर कार्यकर्ता म्हणून आल्याचे स्पष्ट केले. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे खंदे समर्थक असलेल्या जनहित संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सचिन देसाई यांच्यासमवेत प्रकल्प परिसरातील समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आ. प्रसाद लाड यांनी काँग्रेसमुक्त रत्नागिरी जिल्हा केल्याचे सांगितले आणि अ‍ॅड. पटवर्धन यांचे अभिनंदन केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येत्या 25 पासून चार दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. संघटना वाढीसाठी बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुखांशी चर्चा केली जाणार आहे. सहकारातली निवडणूक राजकारण बाजूला ठेवून पॅनलद्वारे लढली जाते. पण सहकारातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भाजप पुढाकार घेईल, असे लाड यांनी सांगितले. यावेळी चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नीलम गोंधळी, डॉ. सुभाष देव, अ‍ॅड. बाबा परुळेकर, राजू मयेकर, सतीश शेवडे, प्रशांत डिंगणकर, उमेश कुळकर्णी, बिपीन शिवलकर, सचिन वहाळकर, अनिल करंगुटकर, दादा दळी, शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here