दापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

0

दापोली : छत्रपती शिवाजी महाराज तमाम देशवासीयांची अस्मिता आहे. राजापूरनंतर चिपळूणपाठोपाठ आता दापोली येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी कला संचालनालयाची परवानगी मिळाली असून या पुतळ्याच्या सभोवतालील परिसर सुशोभिकरणासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी तब्बल रुपये ७२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरीही दिली आहे. मागच्याच वर्षी राजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्तेकरण्यात आलेहोते.हापुतळा आता राजपूर येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनला आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातही छ. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाचे टेंडर काढण्यात येणार असून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या पुतळ्या सभोवतालील परिसर सुशोभिकरणासाठी रुपये १ कोटीच्या निधीला या अगोदरच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री वायकर यांनी मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर या ठिकाणी बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचा खर्चही ते स्वतः करणार आहेत.आता याच धर्तीवर दापोली येथील कॅम्प दापोली, येथील आरक्षण क्रमांक १५ मधील जागेवर पर्यावरण मंत्री राम दास कदम यांच्या प्रेरणेतून व युवानेते योगेश कदम यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या सभोवतालील परिसराच्या सुशोभिकरणासाठी पालकमंत्री वायकर यांनी नगरोत्थानमधून तब्बल रुपये ७२ लाख इतक्या रकमेला २०१९-२० मध्ये मंजुरी दिली आहे. हा पुतळा बसविण्याचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी कला संचालनालयाकडून तत्काळ परवानगी मिळावी, अशी विनंतीही दापोली नगर पंचायतीकडून पालकमंत्री यांना करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री वायकर यांनी पुढाकार घेतल्याने कला संचालनालयाने कागदपत्रांची तपासणी करुन तत्काळ परवानगीही दिली. मुंबईतील शिल्पकार उत्तम पाचारणे पुतळा साकारत आहेत. त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीस संचालनालयाची मान्यता मिळाली असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here