दीपा मलिकला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार प्रदान

0

नवी दिल्‍ली : ‘रिओ पॅरॉलिम्पिक – 2016’मध्ये सुवर्णपदक पटकावणार्‍या दीपा मलिक हिला गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका सोहळ्यात क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री किरण रिजिजू उपस्थित होेते. कुस्तीपटू बजरंग पुनियालाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु, तो परदेशात असल्याने त्याला नंतर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साईना नेहवाल आणि लक्ष्य सेनसारख्या स्टार खेळाडूंना कोचिंग देणार्‍या विमल कुमार यांना द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्डने सम्मानित करण्यात आले. टेबल टेनिस कोच संदीप गुप्‍ता, रामबीर सिंह खोकर (कबड्डी), मेजबान पटेल (हॉकी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांना द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्ड (जीवनगौरव श्रेणी) देऊन सम्मानित करण्यात आले. शटलर बी. साई प्रणीत, स्वप्ना बर्मन (हेप्टैथलॉन), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया (बॉक्सिंग), पूनम यादव (क्रिकेट), कुस्तीपटू पूजा ढांडा, प्रमोद भगत (पैरा-बैडमिंटन), हरमित देसाई (टेटे), फवाद मिर्झा (घोडेस्वारी) यांना ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती कोविंद यांनी मैनुअल फैडरिक्स (हॉकी), अरुप बसक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितेन किर्तने (टेनिस) और लालरेमसानगा (तिरंदाजी) यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here