भारताची माजी कर्णधार मिताली राजची टी -20 मधून निवृत्ती

0

नवी दिल्ली : भारतीय महिला टी -2 0 क्रिकेट संघांची माजी कर्णधार मिताली राजने टी -20 क्रिकेट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने या आपल्या निवृत्तीची घोषणा आज (दि. 3 ) केली. तिने आतापर्यंत 89 टी – 20 सामने खेळत 2 हजार 364 धावा केल्या आहेत. भारतीय महिला संघाकडून टी – 20 प्रकारात सर्वाधिक धावा मिताली राजच्याच आहेत. तसेच तिने टी -20 प्रकारात भारताचे 32 सामन्यात नेतृत्व केले आहे. भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजने टी -20 क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली. यावेळी तिने ‘2006 पासून भारताचे टी-20 मध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर मी निवृत्ती घेत आहे. मला आता 2021 च्या वनडे वर्ल्डकपवर लक्ष केंद्रीत करणार आहे.’ असे सांगितले. इंग्लंडमध्ये झालेल्या टी -20 वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आल्याने अनुभवी खेळाडू मिताली राजचे भारताला वर्ल्डकप जिंकून देण्याचे स्वप्न भंगले होते. तसेच 2017 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.  तिने आज टी – 20 निवृत्तीनंतर ‘माझे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अजून अबधित आहे आणि मी त्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे. मी बीसीसीआयचे मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानते. तसेच भारतीय टी – 20 संघाला मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्घ होणाऱ्या मालिकेसाठी शुभेच्छा देते.’ अशी प्रतिक्रिया देत आपले वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अजून अबाधित असल्याचे सांगितले. मिताली राजने आपला शेवटचा टी – 20 सामना इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीत खेळला होता. त्यात तिने 32 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. मिताली टी – 20 च्या 2000 क्लबमध्ये सामिल होणारी पहिली भारतीय आहे. ती टी – 20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here