चांद्रयान-2 च्या विक्रम लॅंडरशी संपर्कासाठी राहिले फक्त ‘इतके’ दिवस

0

चेन्नई : अख्ख्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भारताचा महत्वकांक्षी प्रकल्प चांद्रयान-2 च्या विक्रम लॅंडरशी संपर्क करण्यासाठी अनेक पातळ्यांवरून प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. या मोहिमेमध्ये आता संपर्क साधण्यासाठी शेवटचे 5 दिवस राहिले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांसह सर्व भारतीयांचे लक्ष चंद्राकडे लागले आहे. 7 सप्टेंबरला लॅंडरला चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही अंतर बाकी असताना संपर्क तुटला होता. तो संपर्क जोडण्यासाठी शास्त्रज्ञांकडे फक्त 5 दिवस राहिले आहेत. कारण लॅंडरला चंद्रावरील एका दिवसापर्यंत (पृथ्वीवरिल14दिवस) काम करता येईल अशा पध्दतीने बनविण्यात आले आहे. संपर्क करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी नासाची मदत घेतली आहे पण अजूनही लॅंडरशी संपर्क झालेला नाही. या महिन्याच्या 20 किंवा 21 तारखेला चंद्रावर रात्र होताच विक्रम लॅंडरशी संपर्क करण्याची शक्यता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इस्रोसह नासाही विक्रम लॅंडरशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नासा आपले ऑर्बिटर मंगळवारी चंद्रावरून घालवले जाईल जेथे विक्रम लॅंडर उतरणार होते. नासाचे ऑर्बिटर फोटो काढत असल्याने विक्रम लॅंडरच्या उतरण्याच्या जागेचा शोध घेऊन संपर्क करण्यास मदत होईल. विक्रम लॅंडरशी तुटलेला संपर्क जोडण्यासाठी इस्रो सर्व प्रयत्न करत आहे. पण अजूनही लॅंडरशी संपर्क करण्यात इस्रो शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. 7 सप्टेंबरला लॅंडरला चंद्रवर उतरण्यासाठी अवघे काही अंतर बाकी असताना त्याच्यात काही तांत्रिक बिघाड झाला आणि संपर्क तुटला होता. त्यानंतर नासा ऑर्बिटरच्या हाय रिझोल्युशन कॅमेराने काही दिवसांपूर्वी अपोलो-11 च्या लँडिंगचे फोटो पाठवले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here