चिपळूणातील 60 शेतकर्‍यांचे 75 लाख लुबाडले

0

चिपळूण : कडकनाथ कुक्कुटपालन योजनेतून चिपळुणातही अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 60 शेतकर्‍यांची 75 लाखांची फसवणूक झाली आहे. याबाबत आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांच्याकडे तक्रार केली असून आता लवकरच इस्लामपूर येथील रयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीविरोधात व संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. चिपळूण तालुक्यातील शेतकर्‍यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर 2018 मध्ये इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील कंपनीच्या कार्यालयात शेतकरी गेले व त्यांनी कडकनाथ कुक्कुटपालन योजनेची माहिती घेतली. यावेळी शेतकर्‍यांच्या आर्थिक गुंतवणुकीनुसार विविध योजना सांगण्यात आल्या व याबाबत कंपनी आणि शेतकर्‍यांमध्ये करार देखील झाला. या करारानुसार शेतकर्‍यांनी आर्थिक पूर्तता केली. मात्र, त्यानंतर कंपनीकडून करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पूर्तता झाली नाही व अपेक्षित प्रतिसादही मिळाला नाही. त्यामुळे कंपनीचे संबंधित असलेले सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, गणेश शेवाळे यांना येथील शेतकर्‍यांनी अनेकवेळा दूरध्वनी केला, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीकडून लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. यामध्ये झिनत हिलाल इनामदार यांचे 2 लाख 17 हजार, हिलाल अब्दुलगनी इनामदार यांचे 2 लाख 17 हजार, दीनमहंमद कुपे यांचे 2 लाख 17 हजार, आसीफ इनामदार यांचे 2 लाख 17 हजार, अशोक दत्ताराम चव्हाण यांचे 3 लाख 28 हजार, सुभाष रामचंद्र कदम यांचे 2 लाख 90 हजार, मंदार मधुकर चांदीवडे यांचे 4 लाख 35 हजार, गणेश शेखर लाड यांचे 2 लाख 17 हजार, मधुकर महादेव चांदीवडे यांचे 3 लाख 24 हजार, अशोक चव्हाण यांचे 1 लाख 33 हजार, वसंत शंकर राऊत यांचे 1 लाख 31 हजार, दगडू शंकर राऊत यांचे 1 लाख 20 हजार, दिनेश महाजन 2 लाख, राजेश पटेल 1 लाख 33 हजार, विमला पटेल 1 लाख 30 हजार, शर्वरी भंडारी 1 लाख 13 हजार, दीपिका मुसळे 1 लाख 93 हजार, तस्लीमा कवारे 3 लाख रूपये, सतीश सुधाकर कदम 1 लाख 78 हजार, सोनल अतुल  लाड 1 लाख 58 हजार,  विजय भोबेकर 1 लाख 58 हजार, रंजना भोबेकर 1 लाख 58 हजार, श्रीधर पवार 7 लाख 36 हजार, अझरूद्दीन पटेल 40 हजार,  वैभव सुधाकर खेडेकर 2 लाख 10 हजार, गणेश भोबेकर 1 लाख 30 हजार, मंदार कळंबे 2 लाख 50 हजार, जितेंद्र करंजकर 1 लाख 14 हजार, शैलेश माळी 1 लाख 18 हजार, सुधीर राड्ये 1 लाख 45 हजार व अक्षय फटकुरे यांचे 50 हजार रूपये अशी सुमारे 75 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या बाबत या शेतकर्‍यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गुरव यांची भेट घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. यावेळी गुरव यांनी, संबंधितांवर लवकरच गुन्हा दाखल करू असे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here