ओसवाल नगर येथील खुनी हल्ल्याप्रकरणी एकाच्या मुसक्या आवळल्या

0

रत्नागिरी : ओसवाल नगर येथे झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कोतवडे येथून संशयित आरोपी अश्फाक पटेल यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटना घडल्याची खबर मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे तर अन्य तीन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
आज दुपारी दीड च्या सुमारास उद्यमनगर जवळील ओसवाल नगर येथे तौसीफ गुहागरकर या तीस वर्षीय तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. तौसीफ नमाजासाठी जात असताना हि घटना घडली. हल्लेखोर तरुणांनी तौसीफच्या मानेवर व हातावर धारधार शास्त्राने वार केले. जखमी तौसीफला इस्पितळात दाखल करण्यात आले. हल्लेखोर तरुण आणि तौसीफ हे नोकरीनिमित्त सौदी येथे एकाच खोलीत रहात होते. तौसीफ सुट्टीवर तर हल्लेखोर तरुण नोकरी सोडून भारतात आला होता. सौदी येथे नोकरी करता असतानाच काही झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे. घटना घडताच रत्नागिरी पोलीस सतर्क झाले व हल्लेखोराच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली. तर पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी तौसीफ गुहागरकर या जखमी तरुणाची इस्पितळात जाऊन भेट घेतली आहे

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here