२१ ऑक्टोबरला होणार महाराष्ट्राबरोबर १८ राज्यांत मतदान

0

नवी दिल्ली : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल आरोरा यांनी आज (दि.२१) दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या बरोबरच निवडणूक आयोगाने १८ राज्यांतील ६३ विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. तसेच याचबरोबर बिहारमधील एक लोकसभेची पोटनिवडणुकही जाहीर केली आहे. पण, साताऱ्यासह सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्या. त्याचबरोबर आजपासून आचारसंहिताही लागू झाली आहे. या राज्याबरोबरच अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, पदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कम, तामिळ नाडू, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेश या १८ राज्यातही पोटनिवडणुका होणार आहेत. या राज्यांपैकी कर्नाटकमधील १५ विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण ज्या १७ अपात्र आमदारांमुळे एचडी कुमारस्वामींचे सरकार पडले होते त्यापैकी १५ जागांवर महाराष्ट्राबरोबर निवडणुका होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here