मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली भाट्ये समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

0

रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर जाऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘कचरा करू कमी, आरोग्याची मिळेल हमी व स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ अशा घोषणा दिल्या. स्वच्छता करतेवेळी विद्याथ्यांच्या चेहेऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. उपक्रमाचे आयोजन रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्यावतीने करण्यात आले होते. रत्नागिरीतील फक्त दोन शाळांना या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. या मोहिमेचे कौतुक करताना मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या कि, मुकुल माधव विद्यालयाचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणे नसून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारी हा भाव रुजविणे हा आहे. त्याचबरोबर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हि भावना आमच्या विद्याथ्यांमध्ये बिंबवणे हा होय. त्याच अनुषंगाने आमची शाळा वाटचाल करीत आहे. या स्वच्छता मोहिमेवेळी तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर अतुल दांडेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. यावेळी सर्व विद्याथ्यांना स्वच्छतेचा संदेश असलेला टी शर्ट, कॅप यांचे वाटप करण्यात आले. अतुल दांडेकर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सचिन कोल्हे, अधीक्षक राधा करमरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. भावी काळात स्वच्छता अभियान राबविण्याबद्दल मार्गदर्शनहीं केले




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here