चुकून एमआरआय मशीनमध्येच राहिला पेशंट

0

हरियाणाच्या पंचकूला सेक्टर-6 मधील जनरल हॉस्पिटलच्या एमआरआय अँन्ड सिटी स्कॅन सेंटरमध्ये हैराण करणारा प्रकार घडला आहे. 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी 59 वर्षीय राम मेहर हे तपासणीसाठी आले, तेव्हा डॉक्टरांना त्यांनी स्कॅनिंगसाठी एमआरआय मशीनमध्ये टाकले मात्र डॉक्टर त्यांना मशीनमधून बाहेर काढायलाच विसरले.

पंचकूला पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये राम मेहर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मशीनमधून बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र बेल्ट लावला असल्याने ते मशीनमधून बाहेर निघू शकत नव्हते. मशीनमध्ये त्यांचा श्वास गुदमरल्याने, त्यांना जीव जाण्याची देखील भिती वाटली. अखेर प्रयत्न केल्यानंतर त्यांनी बेल्ट काढला.

राम मेहर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची तक्रार हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज, डीजी हेल्थ डॉ. सूरजभान कंबोज, सेक्टर-5 पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर आणखी 30 सेंकद मशीनमध्ये राहिलो असतो, तर मृत्यू निश्चित होता.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, टेक्निशियननेच रूग्णाला बाहेर काढले आहे. या घटनेचा सीसीटिव्ही तपासण्यात येत आहे.

सेंटर इंजार्ज अमित खोखर यांनी सांगितले की, रूग्णाचे 20 मिनिटे स्कॅन घ्यायचे होते. शेवटचे 2 मिनिट बाकी असताना रूग्ण घाबरून हालचाल करू लागला. त्यांना हलण्यास मनाई करण्यात आली होती. टेक्निशियन दुसरी सिस्टम तपासात होता. 1 मिनिट बाकी असताना रूग्ण मशिनच्या अर्धा बाहेर आला होता. टेक्निशियननेच रूग्णाला बाहेर काढले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here