मध्य प्रदेश – हवाई दलाचे मिग -21 विमान ग्वाल्हेरजवळ कोसळले

0

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील तळाजवळ भारतीय हवाई दलाचे मिग २१ हे विमान कोसळले. सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. दुर्घटनाग्रस्त झालेले मिग २१ हे प्रशिक्षित विमान होते. नियमित गस्त घालण्यासाठी या विमानाने उड्डाण केले होते. यात एक ग्रुप कॅप्टन आणि एक स्क्वॉड्रन लीडर होते. उड्डाणानंतर काही वेळातचं हे विमान ग्वाल्हेर हवाई तळाजवळ कोसळले. दोन्ही वैमानिक सुरक्षित विमानातून बाहेर पडले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. या वर्षात मिग कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. 
 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here