दि यश फाऊंडेशन कॉलेजचा एएनएम परीक्षेचा निकाल १०० टक्के

0

रत्नागिरी : दि यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एएनएम परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम वर्ष एएनएममध्ये जयश्री किंजळे हिने ७७ टक्क्यांसह प्रथम, रुणाली करंडे हिने ७४.५ टक्के गुणांसह द्वितीय व नयना किसन बने हिने ६८.७ टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळवला. द्वितीय वर्ष एएनएममध्ये प्राची सिनकर हिने ७९ टक्क्यांसह प्रथम, योगिता वाजे हिने ७८ टक्क्यांसह द्वितीय व सुप्रिया पवार हिने ७७ टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळवला. सातत्याने १०० टक्के निकालाची परंपरा या कॉलेजने जपली आहे. याबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्रनाथ माने, सह व्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने आणि मिहीर माने, रजिस्ट्रार शलाका लाड, प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here