शरद पवार आज ‘ईडी’ कार्यालयात

0

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज, शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बेलार्ड पियर येथील कार्यालयात जाणार असल्याने त्यांना पाठिंबा म्हणून पक्षाचे हजारो कार्यकर्ते ईडी कार्यालयाजवळ जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी डोंगरी, जे. जे. मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, कफ परेड, कुलाबा आणि मरीन ड्राइव परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. येथील बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तसेच पोलिसांनी येथील वाहतूक व्यवस्थेतही बदल केला आहे. सुमारे १ हजार ५०० पोलिस या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्याने या भागाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here