तरूणीची छेड काढणाऱ्या तरूणास चोप

0

राजापूर : महाविद्यालयीन तरूणीची छेड काढणाऱ्या एका तरूणाला राजापूर शहरालगतच्या हर्डी येथील ग्रामस्थांनी चोप देत राजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरानजीकच्या एका प्रशिक्षण संस्थेत शिकणारा तरूणाने गुरूवारी एक तरूणी घरी जात असताना तीची छेड काढली. याबाबत संबंधित तरूणीने घराच्यांना व वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर शुकवारी सकाळी हर्डी ग्रामस्थांनी संबंधित तरूणाला पकडून चोप दिला. याबाबत राजापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण त्यांचे सहकारी के.आर.तळेकर घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांना शांत करत संबंधित तरूणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here