रत्नागिरी शहरात पाणी पुरवठ्यात व्यत्यय

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. शीळ धरणावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी शहराला पाणी पुरवठा झाला नाही. शुक्रवारी दुपारनंतर ज्या भागांमध्ये पाणी सोडले जाते तेथील बहतांश ठिकाणी शुक्रवारीही पाणी मिळालेले नाही. ज्या-ज्या ठिकाणी शुक्रवारी पाणी मिळाले तेथे पाण्याचा दाब फारच कमी होता. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाजवळचा वीज पुरवठा गेल्या बुधवारी मध्यरात्री खंडित झाला. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेला पाणी पुरवठ्याबाबत शहरवासियांना माहितीही देता आली नाही. वीज नसल्याने धरणातील पाण्याचे पंपिंग होऊ शकले नाही. त्यामुळे धरणावरुन जेपाणीशहरातील साठवण टाक्यांमध्ये जमा होते ते होऊ शकले नाही. परिणामी गुरुवारी संपूर्ण दिवस शहरात पाणी पुरवठा झाला नाही. गुरुवारी शीळ धरणावरील वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर धरणातील पाणी पंपिंग करुन साठवण टाक्यांमध्ये सोडण्यात आले. मात्र या टाक्याच पूर्णपणे रिकाम्या झाल्याने दुसऱ्या दिवशी त्या टाक्यांची अपेक्षित पातळी होऊ शकली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी मिळाले ते कमी दाबाने मिळाले. मात्र दुपारनंतर ज्या परिसराला नियमित पाणी पुरवठा त्याठिकाणी शुक्रवारीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही.





LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here