टेरव येथे देवीच्या घटस्थापनेवरुन ग्रामस्थांमध्ये वाद

0

चिपळूण : ऐन नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या दिवशी टेरव येथे श्री भवानी-वाघजाई देवीच्या घटस्थापनेवरुन ग्रामस्थांमध्ये वाद झाला. यावेळी धक्काबुक्की झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. अखेर या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी वीसजणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी टेरव येथील अशोक सजनराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलिसांनी येथील किशोर मनोहर कदम, अनंत सोनू कदम, संतोष गंगाराम चांदीवडे, किशोर कृष्णा कदम, सुभाष शंकर काणेकर, संतोष बाबाजी जोगळे, रमेश रामा हरेकर, एकनाथ सखाराम माळी, अजित तुकाराम कदम, विनोद वामन वासकर, विलास जिजाराम पंडव, सुनील रामचंद्र तांदळे, राजेंद्र सहदेव साळवी, संतोष बापू कराडकर, अनंत गंगाराम चांदीवडे, सचिन तुकाराम साळवी, चंद्रकांत शंकर कदम, गंगाराम भिकू साळवी, तुकाराम मानाजी साळवी, सखाराम बाबा कदम (सर्व रा. टेरव) यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अशोक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किशोर कदम यांनी भवानी मंदिरात बेकायदा जमाव करून घट मांडण्यासाठी बियाणे पेरत असताना एका ग्रामस्थाच्या हातातून धान्याची पिशवी हिसकावून घेतली व वीस ते चाळीसजणांनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिस मध्यस्थीचा प्रयत्न करीत असतानादेखील पोलिसांचेम्हणणेधुडकावून लावले. बेकायदा जमाव करुन तसेच विधानसभा निवडणूक आचारसंहिता भंग करुन तेढ निर्माण केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी वीसजणांना अटक केली. सोमवारी (दि.३०) चिपळूण न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. टेरवमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here