गॅस सिलिंडरच्या किमतीत १५ रुपयांनी वाढ

0

नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या तोंडवर सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. एकीकडे इंधन दरवाढीचा भडका तर दुसरीकडे कांद्याच्या वाढत्‍या दरामुळे सर्वसामान्‍य नागरिकांचे चांगले वांदे होत आहे. आता यासर्वात भर पडली आहे ती घरगुती गॅसची. मंगळवार (दि.१) ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, कांद्याच्या दर आणि आता गॅस यासर्वांमुळे सर्वसामान्यांचे बजेट आता चांगलेच कोलमडणार आहे. देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर १५ रुपयांनी महागला आहे. आज नवी दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी ६०५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागणार आहे. मुंबई, चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः ५७४.५० आणि ६२० रुपये झाले आहेत. तर १९ किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत १०८५ रुपये झाली आहे. कोलकात्यात ११३९.५० रुपये, मुंबई १०३२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये याच १९ किलोच्या सिलिंडरचे दर ११९९ रुपये आहे. सप्टेंबरमध्येही गॅस सिलिंडरचे दर वाढले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here