खेड- भरणे मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

0

खेड : खेड- भरणे मार्गाची खड्यामुळे झालेली चाळण यामुळे या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खड्यामुळे धोकादायक बनलेल्या या मार्गावरील खड्यांबाबत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी लक्ष घालत पडलेले खड्डे रेडीमिक्स सिमेंटने भरण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर महावितरण तसेच नगर पालिकेने विकासकामासाठी या आधी केलेली खोदाई यामुळे मार्ग धोकादायक बनला होता. ठेकेदाराने कोणतीच उपाय योजना न करता केलेली खोदाईमुळे साईडपट्ट्या उखडून गेल्याने त्या धोकादायक मार्गावरूनच वाहतूक सुरु होती. तसेच मुसळधार पावसाने रस्त्याची दैना उडाली होती. याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जांभा दगड टाकून तात्पुरती मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुन्हा खड्डे पडल्याने हा मार्गच वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने अखेर खेडेकर यांनी या प्रश्नी लक्ष घालत रेडी मिक्स सिमेंटने खड्डे बुजवण्यास सुरुवात करून वाहन चालकांना काहीसा दिलासा दिला आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here