मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत बाळ म्हाडदळकर गटाचे वर्चस्व

0

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत पुन्हा एकदा बाळ म्हाडदळकर गटाचे वर्चस्व राहिले. एकूण 14 पैकी 10 जागांवर विजय मिळवण्यात गटाला यश मिळाले. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणूकीत विजय पाटील अध्यक्ष, अमोल काळे उपाध्यक्ष तर, संजय नाईक सचिवपदी बिनविरोध होते. त्यामुळे खजिनदार, संयुक्त सचिव पदासाठी निवडणूक पार पडली. संयुक्त सचिवपदासाठी संगम लाड यांना नमवित शाह आलम शेख (196 मते) यांनी बाजी मारली. खजिनदारपदासाठी म्हाडदळकर गटाचे उमेदवार जगदीश आचरेकर (189) यांनी मयांक खांडवाला यांना पराभूत केले. कार्यकरिणी सदस्य पदासाठी बाळ म्हाडदळकर गटाचे अजिंक्य नाईक (201), गौरव पय्याडे (180),विहंग सरनाईक (165), अभय हडप (160),याझदेगर्दी खोदादाद (133) यांनी बाजी मारली. तर, उन्मेश खानविलकर (241 ),कौशिक गोडबोले (157),अमित दाणी (144) हे स्वतंत्र उमेदवार म्हणून कार्यकरिणीत आले तर, नदीम मेमन 140 (युनायटेड फॉर चेंज) यांनी बाजी मारली. कार्यकरिणी सदस्य पदासाठी बाळ म्हाडदळकर गटाचे अजिंक्य नाईक (201), गौरव पय्याडे (180),विहंग सरनाईक (165), अभय हडप (160),याझदेगर्दी खोदादाद (133) यांनी बाजी मारली. तर, उन्मेश खानविलकर (241 ),कौशिक गोडबोले (157),अमित दाणी (144) हे स्वतंत्र उमेदवार म्हणून कार्यकरिणीत आले तर, नदीम मेमन 140 (युनायटेड फॉर चेंज) यांनी बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here