जलवाहिनी व दूरध्वनी सेवेला फटका

0

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत शहरात रूंदीकरणास सुरुवात झाली आहे. रस्त्यालगत असलेल्या शहरातील पाणी योजनेतील मुख्य पाईपलाईन व दूरध्वनी सेवेला याचा फटका बसला आहे. पाण्याच्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असून महामार्गालगतची
केबल तुटत असल्याने तिनशेहून अधिक दुरध्वनी बंद पडले आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत जागा हस्तांतरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यासाठी बाधीत बांधकामे हटविणे, झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना दोनवेळा मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. या पाईपलाईनची दुरूस्ती करताना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच जमिनीखालून टाकलेली दूरध्वनी केबलही तुटल्याने अनेकांचे दूरध्वनी बंद आहेत. त्यामुळे प्रशासनाने या सर्व गोष्टींची काळजी अगोदरच घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here