साखरपा येथे दोन गाड्यांची टक्कर, ३ जण जखमी

0

रत्नागिरी – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा शिंदेवाडीनजीक दोन गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात तीनजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी संध्याकाळी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या मारुती सियाझ या भरधाव गाडीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मारुती स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात योगीराज सुकाळे ( वय 44 पुणे) ,आर .के .बिनोदी ( वय 40 पुणे), अशपाक चिकटे ( वय 42 दापोली ) हे तिघेजण जखमी झाले.

जखमींना ताताडीने जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे रत्नागिरी- कोल्हापुर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून वाहतूक पूर्ववत केली. तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्रात जाऊन जखमींची पाहणी करुन जबाब घेण्यात आले. तिघांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारसाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास कॉन्स्टेबल जाधव , गराटे ,चव्हाण करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here